जांभवडे येथील आंदोलन प्रकरणी शिक्षण संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांसह 13 जणांवर गुन्हा

शासकीय कामात अडथळा प्रकरणी कुडाळ पोलिसांची कारवाई
Sindhudurg news
बसस्थानकासाठी विद्यार्थ्यांनी रस्तारोको केला,Pudhari Photo
Published on
Updated on

कुडाळ ः पुढारी वृत्तसेवा

विद्यार्थ्यांना वेठीस धरून बस थांबाच्या मागणीसाठी आंदोलन करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी जांभवडे हायस्कुलचे संचालक सुभाष मडव, मुख्याध्यापक अनिल कासले यांच्यासह सात शिक्षक व दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी असे एकुण 13 जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद कुडाळ आगाराचे एसटी चालक विजय नारायण म्हाडगुत यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. अशी माहीती कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी दिली. एका विद्यालयाच्या मुख्याध्यापक व अनेक शिक्षक व कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल होण्याची हि पहिलीच घटना आहे.

जांभवडे विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी बस थांबा हवा या मागणीसाठी गेले दोन दिवस संस्था संचालक सुभाष मडव यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी जांभवडे येथे रास्ता रोको आंदोलन केले होेते. दरम्यान कुडाळ आगाराचे एसटी बस चालक विजय म्हाडगुत हे कुडाळ ते घोडगे अशी एसटी बस वाहक दिपक विष्णु धूरी ( रा. वाडीवरवडे) यांच्यासह 2 वाजता कुडाळ येथून घोडगे येथे गेले होते. यानंतर हे चालक 4 वा. आपल्या ताब्यातील बस घेवून परत येत होते. यावेळी ते जांभवडे हायस्कुल जवळ आल्यावर त्या ठिकाणी काही लोक विद्यार्थी यांनी रस्ता अडवलेला होता. त्यांनी हा रस्ता याठिकाणी बस थांबा हवा या मागणीसाठी अडविला होता.

बस चालकाने या आंदोलन कर्त्यांना बस मार्गस्थ करण्याची विनंती केली. यामागे कणकवली आगाराची ही एक बस अडकली होती. दोघांनीही विनंती करूनही त्यांनी एसटी महामंडळाच्या एकही बस आपण सोडणार नसल्याची ठाम भुमिका घेतली. दरम्यान या मागणी संदर्भात एसटीच्या कणकवली कार्यालयाशी संपर्क झाला होता. मात्र त्यांनी जवळपास 200 मिटरवर बस थांबे असल्याने या ठिकाणी नवीन बस थांबा तयार होवू शकत नाही असे या आंदोलन कर्त्यांना कळविले होते. तरीही विद्यार्थ्यांना वेठीस धरून कुडाळ व कणकवली आगाराच्या दोन एसटी बस या आंदोलन कर्त्यांनी अडवल्या.

त्यामुळे संघम मताने शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी या संस्थेचे संचालक सुभाष मडव, मुख्याध्यापक अनिल कासले, शिक्षक महेश कदम, अनिल काटकर, विकास पाटील, व्यंकटेश खरात, श्री. पुजारी, दिनेश मेस्त्री, महिला शिक्षिका श्रीम. राऊत, शिपाई संजय मडव, क्लार्क चंद्रकांत चव्हाण, पालक शामराव मडव व संतोष मडव अशा एकुण 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या संदर्भात तात्पुरत्या स्वरूपात एसटी बस थांबविण्यात येतील व त्यानंतर याठिकाणी बस थांबा निर्माण करण्यासंदर्भात कायदेशिर कारवाई करण्यात येईल या एसटी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाअंती संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी केलेले हे रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. अशी माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news