सिंधुदुर्ग : परीक्षेत नापास केल्याप्रकरणी विद्यार्थी व पालकांचे उपोषण

चुकीचा पेपर देऊन नापास केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Student hunger strike
Published on
Updated on

ओरोस ः जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-2024 तृतीय वर्ष हॉस्पिटॅलिटी स्टडीज या क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या 24 विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर देऊन नापास केले आणि फक्त पाचच विद्यार्थ्यांना पास केले, असा आरोप करत नापास झालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले. याबाबत संस्थाचालक, प्रशासन आणि विद्यार्थी यांच्या एकत्र बैठकीत योग्य तो तोडगा काढण्याच्या आश्वासनावर हे उपोषण समाप्त झाले. दरम्यान युवासेनेचे कणकवली शहरप्रमुख प्रतीक रासम यांनी या प्रश्नी न्याय न मिळाल्यास आम्ही संस्थेविरोधात सिनेटकडे तक्रार करू, असा इशारा दिला.

Student hunger strike
UNESCO News | युनोस्को टीम आज सिंधुदुर्ग भेटीवर

या उपोषणाला ठाकरे युवा सेनेचे उपशहरप्रमुख प्रतीक रासम, सिंधुदुर्गनगरी येथील छोटू पारकर, योगेश तावडे, हार्दिक शिकले, सागर सावंत, स्वरूप राणे यांनी पाठिंबा दिला. याबाबत संबंधीत संस्थेने योग्य दखल न घेतल्यास आम्ही सिनेटच्या माध्यमातून संस्थेची मान्यता काढून घेण्यासाठी प्रयत्न करू, वेळ पडल्यास आंदोलन करू, असा इशारा सेना शहरप्रमुख प्रतीक रासम यांनी दिला. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर सहप दाधिकारी यांनी दिलेल्या भेटीत झालेल्या चर्चेत याबाबत संस्थाचालक विद्यार्थी आणि प्रशासन एकत्र बसून या प्रश्न योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासनावर उपोषण सायंकाळी उशिरा समाप्त झाले.

Student hunger strike
सिंधुदुर्ग : कणकवलीत 5 ऑक्टोबर रोजी ‘आरक्षण बचाव’ रॅली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news