Pahalgam Terror attack :दहशतवादी हल्ल्याचा मालवणमध्ये तीव्र निषेध

Terrorism protest: पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून संताप व्यक्त
Pahalgam Terror attack
मालवण ः पाकीस्तानचा ध्वज पायदळी तुडवताना नागरिक.pudhari photo
Published on
Updated on

मालवण ः पापांचा भरला घडा, पाकिस्तानला शिकवा धडा... जिसको चाहिये पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान... जय श्रीराम... भारत माता की जय... अशा घोषणा देत आज मालवणात भरड नाका येथे नागरिकांनी एकत्र येऊन काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून संताप व्यक्त करण्यात आला. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला असून दहशतवाद्यांना पकडून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या निषेधार्थ आज मालवणात भरड नाका येथे नागरिकांनी एकत्र येऊन या हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. तसेच दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या पाकिस्तानचा झेंडा जाळून व पाकिस्तान विरोधात तीव्र घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला. तसेच यावेळी भारताचा राष्ट्रध्वज व भगवा झेंडा फडकविण्यात आला.

यावेळी भाऊ सामंत, विलास हडकर, अ‍ॅड. समीर गवाणकर, डॉ. पंकज दिघे, सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर, आपा लुडबे, महेश कांदळगावकर, श्रीराज बादेकर, गणेश चव्हाण, प्रसाद हळदणकर, शिल्पा खोत, पूजा करलकर, अन्वेषा आचरेकर, अंजना सामंत, महिमा मयेकर, राणी पराडकर, तनुजा चव्हाण, महेश मांजरेकर, किसन मांजरेकर, बबन परुळेकर, ललित चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, ऋत्विक सामंत, आबा हडकर, परशुराम पाटकर, मंदार आजगावकर, संदीप भोजने, दशरथ कवटकर यांच्यासह इतर हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

विलास हडकर, अ‍ॅड. समीर गवाणकर, भाऊ सामंत यानी विचार मांडले. काश्मीरमध्ये झालेला हा दहशतवादी हल्ला पाकिस्तान पुरस्कृत लष्कर ए तोयबा दहशतवादी संघटनेच्या केला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून 27 निरापराध हिंदूंची गोळ्या घालून निघृण हत्या केली.

धर्मावर आधारित दहशत माजविणार्‍या या क्रूर दहशतवाद्यांना भारत सरकारने पकडून कठोर शिक्षा द्यावी, दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news