

मालवण : मालवण शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी करूनही कुत्र्यांची वाढत्या संख्येमुळे शहरात दिवसा आणि रात्री फिरणे धोकादायक आणि मुश्किल बनले आहे. शहरातील किनारपट्टीवरील बाजारपेठ परिसरात सुमारे दीडशे ते दोनशे मोकाट कुत्रे सकाळी दिसून आल्याने अनेकांच्या मनात धडकी भरली होती .
नगरपालिका प्रशासनाकडून दोन वेळा कुत्र्यांची नसबंदी करण्यात आलेली असतानाही वाढत चाललेली कुत्र्यांची संख्या शहरवासीयांसाठी धोकादायक ठरत आहे.
कुत्र्यांच्या त्रासामुळे शहरवासीय त्रस्त असून नगरपालिका प्रशासनाने यावर ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.