

सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा मालवणच्या राजकोटवर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांतच कोसळल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अशातच भाजप नेते आणि माजी खा. नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आ. वैभव नाईक यांच्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवरायांचा पुतळा पडण्यामागे वैभव नाईक यांचा हात तर नाही ना, असा सवाल नीलेश राणे यांनी विचारला आहे, दर्घटनास्थळी नाईक १५ मिनिटांत
कसे काय पोहोचले, असाही सवाल त्यांनी केला आहे. नीलेश राणे यांनी 'एक्स' वरून काही सवाल उपस्थित केले आहेत. ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा ठाकरे गटाचे आ. वैभव नाईक हे पंधराव्या मिनिटात घटनास्थळी कसे पोहोचले ? आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे ५० किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटांत नाईक कसे पोहोचू शकतात, अशी विचारणा राणे यांनी केली आहे.