

कणकवली: सिंधुदुर्गातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नगरपंचायत क्षेत्रात मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने व मतदान सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्र व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकार तृप्ती धोडमिसे यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिले.
2 डिसेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत कार्यकर्ते व समाजकंटकांमध्ये काही कारणावरून वादविवाद झाल्यास आणि कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण झाल्यास योग्य ते आदेश देण्याकरिता विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी
सावंतवाडी-नायब तहसीलदार मनोज मुसळे, निवडणूक नायब तहसीलदार सविता कासकर, महसूल नायब तहसीलदार उर्मिला गावडे. मालवण-निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, महसूल नायब तहसीलदार निलिमा प्रभूदेसाई, नायब तहसीलदार नागेश शिंदे, निवासी नायब तहसीलदार अमर जाधव. वेंगुर्ले- निवासी नायब तहसीलदार राजन गवस, महसूल नायब तहसीलदार क्षितिजा जोशी, निवासी नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने.कणकवली- नायब तहसीलदार दीपाली पंडित, निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, निवडणूक नायब तहसीलदार विजय वरक, महसूल नायब तहसीलदार मुकुंद मुंडले यांची नियुक्ती जिल्हाधिकार्यांनी केली आहे.
न.पं. हद्दीतील मतदान केंद्र असणार्या शाळांना सुट्टी
सोमवार 1 डिसेंबर व मंगळवार 2 डिसेंबर रोजी सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत यांच्या हद्दीतील मतदान केंद्र असणार्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित निवडणूक अधिकार्यांनी मतदान केंद्र म्हणून वापरण्यात येणार्या शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांच्या इमारतीमधील आस्थापना 01 व 02 डिसेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश होण्याची विनंती केली होती. त्यानुसार सिंधुदुर्गातील चारही नगरपरिषद व नगरपंचायतीच्या मतदारसंघात 2 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.