

कसाल : जगाला भेडसावणाऱ्या अनेक समस्या आहेत, त्यातील एक म्हणजे ऊर्जा. एका तरुणाने याच विषयाचे गांभीर्य ओळखून मुंबईमधील विलेपार्ले स्थित मुकेश पटेल इंजिनिरिंग युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिरिंगची पदवी मिळविली आणि मास्टर इन इंटरनॅशनल ठशर्पीरलश्रश एनर्जीसाठी जर्मनीमधील बायर्ण राज्यातील आंबेर्ग या शहरातील जढक वायडन युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळविला. कसालकर कुटुंब मूळचे कुडाळ तालुक्यातील कसाल गावचे असल्याने घरात मालवणी भाषा, शिक्षण इंग्लिशमधून आणि मातृभाषा मराठी. जर्मनीमध्ये प्रवेश मिळविण्याची पहिली अट जर्मन भाषा. मुंबई मध्ये कोणताही ट्युशन क्लासेसला न जाता जर्मन भाषा शिकून नामवंत युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळविला आणि मास्टर इन इंटरनॅशनल एनर्जी ठशर्पीरलश्रश या क्षेत्रात पदवी प्राप्त केली.
भारताबरोबरच जगातील उच्च शिक्षण घेणाऱ्या असंख्य मुलांना शिक्षणाचे महत्व आणि येणाऱ्या अडचणी यावर मात करता यावी यासाठी यूट्यूबवर एडुकेशन चॅनेल सुरु केले आणि असंख्य मुलांना प्रवेश घेण्यास मदत केली. जर्मन भाषा प्रभुत्व आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना मदत करण्याच्या या कार्याची युनिव्हर्सिटीने दखल घेत युनिव्हर्सिटीचा ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून घोषणा केली.
जर्मनीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती मिळतात. त्या सर्व शिष्यवृत्ती देणाऱ्या कंपनीचा रोल मॉडेल म्हणून सन्मान करण्यात आला. आसाम सरकार शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारचे आमूलाग्र बदल घडवत आहे आणि परदेशात देण्यात येणारी शिक्षण पद्धती आसाममध्ये लागू करणार आहे. आसाम सरकारचे शिक्षण विषयक शिष्टमंडळ जर्मनीमध्ये गेले असता जर्मन युनिव्हर्सिटीच्या ऑथॉरिटीने मेघराज कसालकरची या शिष्टमंडळात नियुक्ती केली. आसाम सरकारचे आयएएस ऑफिसर नारायण कोंवर, आसाम शासनाचे उच्च शिक्षण विभागाचे आयुक्त व सचिव तसेच ठणडअ / झच-णडकअ, आसामचे मिशन संचालक यांनी मेघराजचे हे कार्य बघून आसाममधील गुहावटी येथे होणाऱ्या शिक्षण विषयक संमेलनसाठी आसाम सरकारच्या वतीने 29 ते 31 जानेवारीला होणाऱ्या या संमेलनसाठी आणि आसाममधील उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या मुलांना मार्गदर्शन देण्यासाठी विशेष निमंत्रण दिले. शिक्षण कोणतेही असो त्याचा योग्य उपयोग आपल्या देशासाठी करता येईल यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मेघराज कसालकर या कार्यामुळे भारत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान आज अभिमानाने उंच झाली आहे.