सिंधुदुर्ग: तळवडे येथे पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू: एकाला वाचविण्यात यश

जयदीप पांडुरंग घाडी
जयदीप पांडुरंग घाडी

देवगड, पुढारी वृत्तसेवा : तळवडे झाजमतर खाडीत (ता. देवगड) पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१०) दुपारी ४.३० ते रात्री १२.३० च्या दरम्यान घडली. जयदीप पांडुरंग घाडी (वय २३, रा. तळवडे, घाडीवाडी) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप आपल्या चार मित्रांसोबत गुरुवारी दुपारी ४.३० च्या सुमारास तळवडे झाजमतर खाडीतून वाणीवडे येथे पोहत जात होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडू लागले. बुडताना त्यांनी आरडाओरड केल्यामुळे खाडीकिनारी मच्छीमार करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी बोटीच्या सहाय्याने यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यातील एकाला वाचविण्यात यश आले. मात्र, जयदीप हा सापडला नसल्याने त्याचा शोध घेतला जात होता. रात्री साडेबाराच्या सुमारास झाजमतर किनाऱ्यालगत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

याबाबतची फिर्याद जयदीपचे वडील पांडुरंग घाडी (वय ६०) यांनी देवगड पोलिसांत दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा रीतसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महाडिक करीत आहेत.

जयदीप हा अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा होता. तो गावात गवंडी काम करत असे. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील व तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news