Sindhudurg News : एकाच रात्रीत विहिरीच्या पाणीपातळीत वाढ!

वेत्ये गावात वनराई बंधाऱ्याचे आशादायी व सकारात्‍मक चित्र : जिल्हाधिकारी, जि. प. अध्यक्षांनी केले श्रमदान
Sindhudurg News
वेत्ये येथे वनबंधारा बांधण्यात आला. त्यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रमोद कामत, वीरसिंग वसावे, श्रीधर पाटील, सुस्मिता जाधव आदी.
Published on: 
Updated on: 

ओरोस : सर्वात जास्त पाऊस पडणारा कोकण यंदा दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहे. यामुळे निर्माण झालेला संभाव्य टंचाईचा धोका लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंवर्धनाची प्रभावी चळवळ उभी राहिली आहे. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आले. या उपक्रमामुळे अवघ्या दोन दिवसात परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे आशादायी चित्र दिसून आले. विशेष म्हणजे या श्रमदान मोहिमेसाठी गावातील शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्यासोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत तसेच अन्य अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी श्रमदान केले.

वेत्ये गावात वनराई बंधारे बांधणे कामाचे भूमीपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सावंतवाडीचे प्रांताधिकारी वीरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी पं. स. सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, पं. स. सदस्य जितेंद्र गावकर, बिडीओ नीलेश जाधव, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, ग्रामविकास अधिकान केले.

विहिरीच्या पाणीपातळीत एकाच रात्रीत तब्बल तीन फुटांनी वाढ

ग्रा. पं. सदस्य सुनील गावडे यांनी मोहिमेमागील महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकला. महिला ग्रामसंघाच्या सहायाने प्रत्येक वॉर्डमध्ये बंधारे बांधण्याची मोहीम राबवली जात आहे. महिलांनी घातलेल्या पहिल्याच बंधाऱ्यामुळे एका विहिरीतील पाण्याची पातळी एकाच रात्रीत तब्बल तीन फुटांनी वाढल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news