वेंगुर्ले तालुक्यात होळीचे उत्साहात पूजन; रंगांची उधळण

Sindhudurg Holi 2025 | Vengurla Holi Celebrations | ठिकठिकाणी पोफळीची होळी
Vengurla Holi Celebrations
वेंगुर्ले तालुक्यात होळी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

वेंगुर्ले, पुढारी वृत्तसेवा : वेंगुर्ले तालुक्यात होळी उत्सवाला प्रारंभ झाला असून गुरूवारी व शुक्रवारी प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार आंब्याची व सुपारीच्या झाडाची म्हणजेच पोफळीची होळी घालण्यात आली. तर शुक्रवारी विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमीही साजरी करण्यात आली. (Sindhudurg Holi 2025)

कोकणात गणेश चतुर्थीप्रमाणेच होळीचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गुरूवारी सायंकाळी ७ वाजतानंतर होळी उत्सवाला प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात आंब्याच्या, पोफळीच्या होळी नाचवत नाचवत मांडावर आणण्यात आली. तेथे पूजन करुन गा-हाणे करण्यात आले. वेंगुर्ले शहरात गुरूवारी रात्री दाभोसवाडा, विठ्ठलवाडी, गिरपवाडा, भुजनाकवाडी, कलानगर, पूर्वस मंदिर, होळकर मंदिर, दत्तमंदिर, सुंदर भाटले याठिकाणी तर शुक्रवारी सकाळी कुबलवाडा आधी ठिकाणी होळी घालण्यात आली. (Vengurla Holi Celebrations)

तर सायंकाळी देऊळवाडा, परबवाडा याठिकाणी होळी संपन्न होणार आहे. या उत्सवात अबालवृद्धांनी सहभाग घेऊन होळी उत्सवाचा आनंद लुटला. तालुक्यात ग्रामीण भागातही होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Vengurla Holi Celebrations
Sindhudurg Holi 2025 | वैभववाडीत वर्षभर बंद असलेली घरे उघडली; होळी देवाला नवस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news