Stray Dog Attack : भुईबावड्यात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात 5 जण गंभीर

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
Dog Attack
Dog AttackPudhari
Published on
Updated on

वैभववाडी : भुईबावडा परिसरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने उच्छाद घातला आहे. या कुत्र्याने मंगळवारी सकाळी 5 जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सोमवारी सकाळी जयवंती दत्ताराम पांचाळ (रा.ऐणारी), रघुनाथ भिकाजी मोहिते (रा.ऐणारी), संतोष बापू शेळके (रा.भुईबावडा), राजेंद्र रमेश पाथरे (रा.तिरवडे), परशुराम राठोड (रा.भुईबावडा) या पाच जणांचा कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. यातील दोन वयोवृद्ध आहेत. सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे उपचार सुरू आहेत. तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून भटक्या कुत्र्यामुळे रस्त्यात कुत्री आडवी येऊन अनेक मोटार सायकलस्वार पडून जखमी झाले आहेत. तसेच पाळीव प्राण्यांना सुद्धा या भटक्या कुत्र्यांकडून त्रास दिला जात आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news