सिंधुदुर्ग : तलाठी झाले पोलिस उपनिरीक्षक

‘आम्ही कणकवलीकर’कडून विकास चाळके यांचा सन्मान
 Sindhudurg News
कणकवली : विकास चाळके यांचा सन्मान करताना अशोक करंबळेकर. उपस्थित दीक्षांत देशपांडे, गंगाराम कोकरे, दिलीप पाटील, विलास चव्हाण, सत्यवान माळवे आदी.
Published on
Updated on

कणकवली : ऑगस्ट -2024 मध्ये विकास चाळके कणकवली तालुक्यात नडगिवे गांवचे तलाठी म्हणून रूजू झाले. आपले नियत कर्तव्य पार पाडत नागरिकांना सेवा देत असताना त्यांचा एम.पी.एस.सी.चा पोलिस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास सुरू ठेवला होता. सातारा जिल्ह्यात पाटण-कोदळ हे विकास चाळके यांचे मूळ गाव. मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा व बी.ए.(राजकारण शास्त्र व इतिहास) असे त्यांचे शिक्षण झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक पदाच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर ‘आम्ही कणकवलीकर’ यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यश मिळाले, पद मिळाले तरी उत्कर्षासाठी जर प्रयत्न केले, कष्ट उपसले तर गगनालाही गवसणी घालता येते हे विकास चाळके यांनी दाखवून दिले आहे. परिश्रम करणार्‍याचे भविष्य नेहमीच उज्ज्वल असते.असे गौरवोद्गार आम्ही कणकवलीकर अशोक करंबेळकर काढले. विकास चाळके यांनी पोलिस उपनिरीक्षक पदाच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांचा कणकवली तहसील कार्यालयात महसूल कौटुंबिक सन्मान सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. 25 मार्च रोजी हा परीक्षा निकाल जाहीर झाला असून त्यात विकास चाळके यांनी यश संपादन केले आहे. तहसीलदार दीक्षांत देशपांडे म्हणाले, चाळके कामात चोख असत, त्यांच्याबद्दल कधीही तक्रारी झाल्या नाहीत. वेळोवेळी ते आपल्या समस्या, अडचणी मांडत असत आणि त्यांचा वरिष्ठ म्हणून मी त्याना मार्गदर्शन करत असे. माझ्या कार्यालयातील आणखीही काही कर्मचारी स्पर्धा परीक्षांना बसले असून तेही असेच यश मिळवतील असा मला विश्वास आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ढोर मेहनतीपेक्षा नेमकेपणा, समयसूचकता व तारतम्य आवश्यक असते आणि मग यश तुमच्यापासून दूर पळत नाही,असे सांगितले या सोहळ्यात नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, दिलीप पाटील, विलास चव्हाण, सत्यवान माळवे, बापू जाधव,कणकवली तहसीलदार कार्यालयातील सर्व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

परिस्थितीमुळे तलाठी नोकरीत रूजू झालो असलो, तरी शिक्षण घेतानाच मी पोलिस उपनिरीक्षक हे माझे ध्येय निश्चित केले होते. तसे प्रयत्न सातत्याने करीत राहिलो म्हणून आज यश मिळाले. तलाठी नोकरी करताना परीक्षा कालावधीत तहसीलदार दीक्षांत देशपांडे व माझे सहकारी यांनी रजा सुट्ट्या न कुरकुरता दिल्या व माझे दफ्तरही सांभाळले यासाठी मी सर्वांचा कृतज्ञ आहे. त्यांच्या या मदतीचा मोठा सहभाग माझ्या यशात आहे. भविष्यात माझी सेवा सर्वसामान्य नागरिकांना समाधान देणारी व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारी असेल.
विकास चाळके, तलाठी- नडगिवे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news