सिंधुदुर्ग : वेंगुर्लेच्या विकासासाठी भरीव निधी

मंत्री नितेश राणे; वेंगुर्लेत भाजप सदस्य नोंदणी बूथला भेट
Vengurla growth projects
वेंगुर्ले : भाजपा सदस्यता नोंदणी बूथला ना. नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित प्रभाकर सावंत, मनीष दळवी, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, भूषण सारंग व अन्य . (छाया : अजय गडेकर)
Published on
Updated on

वेंगुर्ले ः महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार नुकतेच स्थापन झाले असून, राज्यात भाजपाने मोठे यश मिळवीले आहे. आज भाजपा सदस्यता नोंदणी प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. वेंगुर्ले नगरपरिषद आज राज्यभर व देशभर आदर्शवत असून, शहरात तसेच संपूर्ण तालुक्यात भाजपाचे सदस्य वाढवून भाजपाची ताकद आणखीन वाढवा. आगामी होणार्‍या निवडणुकांसाठी आतापासूनच सर्वांनी एकदिलाने काम करा. या तालुक्याला, शहराच्या विकासाला मोठा भरीव निधी आपल्यामार्फत निश्चितच दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी वेंगुर्ले येथे दिली.

भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महाअभियान 2025 अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी रविवारी भेट दिली. यावेळी सदस्यता नोंदणी मोहिमेचा त्यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी ना. नितेश राणे यांचे स्वागत केले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, अ‍ॅड.सुषमा प्रभूखानोलकर, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, महिला शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, माजी उपनगराध्यक्ष शितल प्रभूखानोलकर, माजी नगरसेवक नागेश गावडे,मच्छीमार नेते वसंत तांडेल, माजी उपनगराध्यक्ष दाजी परब आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री झाल्यानंतर राणे प्रथमच वेंगुर्लेत:उत्स्फूर्तपणे स्वागत

यावेळी तालुक्यात सुमारे नवीन 1200 सदस्य नोंदणी झाल्याची माहिती देण्यात आली. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर वेंगुर्ले तालुक्यात प्रथमच आलेल्या ना. नितेश राणे यांचे तालुका पदाधिकारी व महिला मोर्चा पदाधिकारी यांच्यावतीने उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी वेंगुर्ले पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात चोख पोलिस बंदोबस्त बजावण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news