सिंधुदुर्ग : २६ जानेवारीला वेंगुर्ले आगार येथील एसटी कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा

सेवा शक्ति संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे व्यवस्थापकांना निवेदन
Sindhudurg News
२६ जानेवारीला वेंगुर्ले आगार येथील एसटी कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा दिला.
Published on
Updated on

वेंगुर्ले : वेंगुर्ले आगारातील वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांनी ही बाब वेंगुर्ले आगार व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिऊनही त्यांनी दखल न घेतल्याने सेवा शक्ति संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या आगार कार्यकारणीने २६ जानेवारीला आगाराच्या प्रवेशद्वारावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे.

कर्मचाऱ्यांवर वेळोवेळी होणारा अन्याय, कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी उद्धट वर्तणूक, चुकीच्या पद्धतीने करण्यात येणारी प्रशासकीय कामे, चुकी नसतानाही कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी आरोपपत्रे , कर्मचाऱ्यांना धमकावणे यामुळे कर्मचारी काम करण्याच्या मानसिकतेत नसून सदर वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांची तात्काळ आगारातून बदली करण्यात यावी, यासाठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे विभागीय सचिव भरत चव्हाण, विभागीय सहसचिव स्वप्निल रजपूत, आगार सचिव दाजी तळवणेकर, आगार उपाध्यक्ष सखाराम सावळ, अनंत झोरे , महादेव भगत, ए.एम.नाईक अक्षय येसाजी, रामदास केदार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news