Sindhudurg News| स्मार्ट मीटर टेस्टिंगमुळे स्ट्रीटलाईट सुरू हाेण्यास विलंब!

बिल थकीत असल्याचे वृत्त चुकीचे; देवगड न. पं. चा खुलासा
Sindhudurg News| स्मार्ट मीटर टेस्टिंगमुळे स्ट्रीटलाईट सुरू हाेण्यास विलंब!
Published on: 
Updated on: 

देवगड : महावितरणच्या स्मार्ट मीटर कार्यक्रमाच्या टेस्टिंगसाठी महावितरणकडूनच विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला हाेता. त्यामुळे देवगड शहरातील स्ट्रीटलाईट काही काळ उशिराने सुरू झाल्या. मात्र, देवगड -जामसंडे नगरपंचायतीने वीजबिल थकीत ठेवल्यामुळे स्ट्रीटलाईटचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याची प्रसिद्ध बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी स्पष्ट केले.

स्ट्रीटलाईटसाठी वापरण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमध्ये विशिष्ट वेळेनुसार विद्युत पुरवठा सुरू-बंद करण्याचे प्राेग्रामिंग करण्यात येत आहे. त्यानुसार सायंकाळी ६ वा. स्ट्रीटलाईट सुरू हाेऊन सकाळी ७ वा. बंद हाेण्याची व्यवस्था स्मार्ट मीटरच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या प्रणालीची टेस्टिंग देवगड शहरात महावितरणकडून करण्यात आली. देवगड-जामसांडे नगरपंचायतीकडून महावितरणचे काेणतेही वीजबिल थकीत नाही.

नगरपंचायतीने वेळेत वीजबिलाचा भरणा केला असून, बिल थकीत असल्यामुळे स्ट्रीटलाईटचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती चुकीची असल्याचे मुख्याधिकारी माने यांनी सांगितले. स्मार्ट मीटरच्या टेस्टिंग आणि प्राेग्रामिंग प्रक्रियेमुळे स्ट्रीटलाईटचा विद्युत पुरवठा नेहमीपेक्षा काहीसा उशिराने सुरू झाला. सध्या देवगड शहरातील स्ट्रीटलाईट सुरळीत सुरू असल्याचेही मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news