

वेंगुर्ले ःअयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापनदिन सोहळ्यानिमित शनिवारी वेंगुर्ले येथील श्रीराम मंदिरात हिंदुधर्माभिमानी मंडळी व चैत्र रामनवमी सप्ताह ग्रुप च्या वतीने श्रीराम नामस्मरण करण्यात आले.
अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 या दिवशी झाली व अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामचंद्र विराजमान झाले. अत्युच्च आनंदाचा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. समस्त देशवासीयांचे स्वप्न या दिवशी साकार झाले. अयोध्या येथे झालेल्या या आनंदी सोहळ्याला आता वर्ष पूर्ण होणार आहे. या वर्षपूर्ती निमित्त समस्त हिंदुधर्माभिमानी मंडळी व श्री रामभक्तांच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी नामस्मरण, तीन वेळा रामरक्षा, करुणाष्टक, पसायदान आदी धार्मिक कार्यक्रम झाले. या नामस्मरण कार्यक्रमास अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, संगीता कुबल ,रत्नप्रभा साळगावकर, वृंदा मोर्डेकर, मृण्मयी केरकर, सुचित्रा रजपूत, बाबुराव खवणेकर, आपा धोंड, संगीता वालावलकर,डॉ. अश्विनी माईंणकर ,सीमा नाईक, रेखा आरोसकर, माधवी मातोंडकर, आकांक्षा परब आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.सायंकाळी उशिरा महाआरती झाली.