सिंधुदुर्ग : शिवा नायक खून कटातील संशयित फरार

Murder conspiracy: संशयित पत्नी सुनंदा ऊर्फ सोनाली शिवाप्पा नायक अटकेत
Shiva Nayak murder case
अटकेत असणारी शिवाची संशयित पत्नी सुनंदा ऊर्फ सोनाली आणि फरार असणारे सीताराम बाबू राठोड, अजित अशोक चव्हाण, अदिक अशोक चव्हाण.pudhari photo
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ शहरातील भाजी विक्रेता शिवा नायक याच्या खून प्रकरणात संशयित पत्नी सुनंदा ऊर्फ सोनाली शिवाप्पा नायक ही अटकेत आहे. उर्वरित सीताराम बाबू राठोड, अजित अशोक चव्हाण, अदिक अशोक चव्हाण हे तिन्ही संशयित फरार असून त्यांचे फोन बंद असल्यामुळे पोलिसांना तपास कामात अडथळा येत आहे. या तिन्ही आरोपींना लवकरच जेरबंद करू, असा विश्वास तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी व्यक्त केला आहे.

शिवा नायक याचा खून 25 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्री उशिरा करण्यात आला. त्याने आत्महत्या केल्याचा जबाब त्याची पत्नी सुनंदा नायक हिने दिल्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा पंचनामा केला होता. मात्र पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही आत्महत्या नसून खूनच असल्याच्या तपासापर्यंत माग काढला, आणि पहिल्यांदा शिवाच्या पत्नीला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच तिने हकिगत सांगितली व ही आत्महत्या नसून खून असल्याचे कबूल केले. बुधवारी घटनास्थळी शिवा नायक कुडाळमध्ये ज्या ठिकाणी राहत होता. त्या ठिकाणच्या भाड्याच्या खोलीतील बेडरूमचा कुडाळ पोलिसांनी पंचनामा केला. तसेच संशयित सीताराम राठोड व शिवा नायक यांची पत्नी ज्या लॉजवर जात होती त्या लॉजला भेट देत लॉज वरील तीन रजिस्टर ताब्यात घेतली.

शिवाचा खून होण्याच्या अगोदर दोन दिवस आधी म्हणजेच 22 डिसेंबरला संशयीत सीताराम राठोड व शिवाची पत्नी कुडाळमधील एका लॉजवर गेल्याची नोंद पोलिसांच्या हाती लागली आहे. दरम्यान संशयित तिन्ही आरोपींच्या मागावर कुडाळ पोलिस असून संशयितांचे फोन बंद असल्यामुळे कुडाळ पोलिसांना तपासात काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. तरी देखील संशयित आरोपींची चारही बाजूने नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयीता मधील सीताराम राठोड याचा भाजीचा टेम्पो कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. लवकरच संशयित तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास श्री. मगदूम यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news