

ओरोस : जिल्ह्यात सात दिवसांच्या गणेशोत्सवाची मोठ्या थाटामाटात फटाक्यांच्या आतिषबाजी, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ९ हजार ३२४ खासगी, तर १ सार्वजनिक गणेशमूर्तीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी गौरी-गणपतीचे, तर रविवारी सात दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. रविवारी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात ठीकठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणेश मूर्तीचे विसर्जन सुरू होते.
सात दिवसांनी पोलिस स्थानक निहाय विसर्जन झालेल्या गणेशमूर्ती
बांदा-६२०, दोडामार्ग-१,०९०, सावंतवाडी-२४८, वेंगुर्ले-१,२९१, निवती- १,२१०, कुडाळ-२,८६०, सिंधुदुर्गनगरी-५७६, कणकवली-६९५, विजयदुर्ग-२४३, देवगड-२७१, आचरा-११०, मालवण-११० असे मिळून ९ हजार ३२४ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तसेच कणकवली येथील एक सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.