

माणगाव : जिल्हा परिषद शाळा मधून मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले जाते. वाडोस जि. प. शाळेचे कामकाज उत्तम आहे, त्यामुळे या ठिकाणी मुलांची पटसंख्या सुद्धा चांगली आहे. आताच्या स्पर्धात्मक उगाच वाटचाल करत असताना पालकांनी मुलाकडे डोळसपणे लक्ष द्यावे असे आवाहन कोकण विभाग उप आयुक्त डॉ. माणिक दिवे यांनी केले.
जिल्ह्यातील शंभर शाळांना भेटी देणे उपक्रम अंतर्गत डॉ. माणिक दिवे यांनी जि. प. वाडोस केंद्र शाळेला भेट दिली. ग्रुप ग्रामपंचायत वाडोस प्रभारी सरपंच संजय म्हाडगुत, गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण म्हाडगुत ,तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष संदीप म्हाडगुत, ग्रामपंचायत अधिकारी भाग्यश्री सावंत, केंद्रप्रमुख मनीषा धुरी, मुख्याध्यापिका सावित्री मडव आदींसह पालक व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेच्या वतीने मुख्याध्यपिका सौ. मडव यांच्याहस्ते डॉ. माणिक दिवे, गटशिक्षणाधिकारी श्री. थोरात, सरपंच श्री. म्हाडगुत यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पहिलीत प्रवेश करणार्या नवीन पाच मुलांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.