Sindhudurg News : सावंतवाडीत दोन ज्येष्ठ नागरिकांचा आकस्मिक मृत्यू

माजगाव आणि म्हाडा कॉलनी येथील घटना
ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठ नागरिकPudhari News Network
Published on
Updated on

सावंतवाडी : सावंतवाडी शहर आणि लगतच्या माजगाव परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दोन्ही नागरिक घरात एकटेच असताना ही घटना घडली असून सावंतवाडी पोलिस या दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.

पहिली घटना : झिरंग म्हाडा कॉलनी

शहरातील झिरंग म्हाडा कॉलनी येथील सुभाष नारायण नाईक (७९) हे राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. नाईक यांच्या घरी दररोज सकाळी नाश्ता आणि जेवण देण्यासाठी एक महिला येते. रविवारी सकाळी ९.३० वा.च्या सुमारास जेव्हा ती महिला नाश्ता घेऊन आली, तेव्हा तिला बंद खोलीतून उग्र वास येऊ लागला. तिने तातडीने शेजाऱ्यांना याची कल्पना दिली. त्यानंतर दरवाजा उघडून पाहिले असता सुभाष नाईक हे मृत अवस्थेत मिळून आले. नाईक यांची पत्नी मानसिक रुग्ण असून त्या बेडवरच असल्याने त्यांना या घटनेची कोणतीही माहिती समजू शकली नाही.

पोलिस तपास सुरू

या दोन्ही घटनांची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे आणि मंगेश शिंगाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दोन्ही घटनांमध्ये मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

दुसरी घटना : माजगाव दत्त मंदिर परिसर

दुसऱ्या घटनेत शहरालगत असलेल्या माजगाव-दत्त मंदिर, मेटवाडी येथे चंद्रकांत वाडकर (८५) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. वाडकर हे घरात एकटेच राहत होते. त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हालचाल न झाल्याने संशय आल्यावर ही घटना उघडकीस आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news