

सावंतवाडी : शहरातील ‘रामेश्वर प्लाझा’ इमारतीमधील मंजूर बांधकामाच्या मर्यादेबाहेर जाऊन समोरील पॅसेजमध्ये अनधिकृतपणे दुकानांचा विस्तार करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध सावंतवाडी नगरपरिषदेने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. या अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये शहरातील काही मोठ्या हस्तींचाही समावेश असून, संबंधितांना नगरपरिषदेमार्फत कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या ३० दिवसांच्या आत हे अतिक्रमण काढून पॅसेज मोकळा करण्याचे स्पष्ट निर्देश नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत.
'रामेश्वर प्लाझा' इमारतीस नगरपरिषदेने दिलेल्या बांधकाम परवानगी आणि मंजूर नकाशानुसार, इमारतीसमोरील पॅसेज हा सार्वजनिक आणि सामायिक वापरासाठी मोकळा ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, नगरपरिषदेने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत आणि उपलब्ध नोंदींच्या तपासणीत काही दुकानदारांनी मंजूर आराखड्याचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. त्यांनी सामायिक पॅसेजच्या जागेवर अतिक्रमण करून आपल्या दुकानांचा अनधिकृत विस्तार केला आहे.
हे अतिरिक्त बांधकाम मंजूर नकाशानुसार नसल्याने ते महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ५२ नुसार 'अनधिकृत विकास' ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी नगरपरिषदेने कलम ५३ अन्वये संबंधितांना अधिकृत नोटीस बजावली आहे. या नोटिसीनुसार, नोटीस मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत संबंधित व्यावसायिकांनी हे अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून पॅसेज पूर्वस्थितीत आणि मोकळा करणे आवश्यक आहे.जर विहित मुदतीत संबंधित दुकानदारांनी हे अतिक्रमण हटवले नाही, तर नगरपरिषदेमार्फत कायदेशीर तरतुदींनुसार प्रत्यक्ष पाडकामाची व कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे. नगरपरिषदेच्या या धडक भूमिकेमुळे शहरातील इतर अतिक्रमणधारकांचेही धाबे दणाणले आहेत.शहरातील ‘रामेश्वर प्लाझा’ इमारतीमधील मंजूर बांधकामाच्या मर्यादेबाहेर जाऊन समोरील पॅसेजमध्ये अनधिकृतपणे दुकानांचा विस्तार करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध सावंतवाडी नगरपरिषदेने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. या अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये शहरातील काही मोठ्या हस्तींचाही समावेश असून, संबंधितांना नगरपरिषदेमार्फत कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या ३० दिवसांच्या आत हे अतिक्रमण काढून पॅसेज मोकळा करण्याचे स्पष्ट निर्देश नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत.
'रामेश्वर प्लाझा' इमारतीस नगरपरिषदेने दिलेल्या बांधकाम परवानगी आणि मंजूर नकाशानुसार, इमारतीसमोरील पॅसेज हा सार्वजनिक आणि सामायिक वापरासाठी मोकळा ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, नगरपरिषदेने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत आणि उपलब्ध नोंदींच्या तपासणीत काही दुकानदारांनी मंजूर आराखड्याचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. त्यांनी सामायिक पॅसेजच्या जागेवर अतिक्रमण करून आपल्या दुकानांचा अनधिकृत विस्तार केला आहे.
हे अतिरिक्त बांधकाम मंजूर नकाशानुसार नसल्याने ते महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ५२ नुसार 'अनधिकृत विकास' ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी नगरपरिषदेने कलम ५३ अन्वये संबंधितांना अधिकृत नोटीस बजावली आहे. या नोटिसीनुसार, नोटीस मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत संबंधित व्यावसायिकांनी हे अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून पॅसेज पूर्वस्थितीत आणि मोकळा करणे आवश्यक आहे.जर विहित मुदतीत संबंधित दुकानदारांनी हे अतिक्रमण हटवले नाही, तर नगरपरिषदेमार्फत कायदेशीर तरतुदींनुसार प्रत्यक्ष पाडकामाची व कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे. नगरपरिषदेच्या या धडक भूमिकेमुळे शहरातील इतर अतिक्रमणधारकांचेही धाबे दणाणले आहेत.