

राजापूर : राजापूर शहर बाजारपेठेतील एका सलूनमध्ये घुसून एका तरुणाला दोघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत हातातील कड्याने डोक्यावर प्रहार केल्याने तरूण गंभीर जखमी झाला. सुरज पुरुषोत्तम चव्हाण (३०, राजापूर, चव्हाणवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी साहिल गुरव (२४), आयुष गुरव (२१, राजापूर धोपेश्वर, गुरववाडी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सुरज चव्हाण हा आपल्या सलूनमध्ये गुरुवारी सायंकाळी काम करत होता. यावेळी साहिल गुरव व आयुष गुरव हे दोघे सलूनमध्ये घुसले. व त्यानी सुरजला मारहाण करायला सुरुवात केली. एकाने हातातील कड्याने सुरजच्या डोक्यात प्रहार केला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर जखमी सुरजला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले.