सिंधुदुर्ग : साळगाव सर्व्हिस रोडचे काम निकृष्ट

वर्षभरातच कामाची दयनीय अवस्था : ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
Salgaon Service Road
साळगाव सर्व्हिस रोड
Published on
Updated on

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील साळगाव हायस्कूल येथील बॉक्सवेलच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. पहिल्याच पावसात सर्व डांबरीकरण उखडून गेले आहे. काही ठिकाणी काम अर्धवट असून काही ठिकाणी केलेले काम वाहून गेले आहे. त्यामुळे याबाबत संबंधित प्रशासनाने लक्ष घालून हे काम चांगल्या दर्जाचे करून घ्यावे, अन्यथा यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Salgaon Service Road
सिंधुदुर्ग : कार-रिक्षा अपघातात दोघे गंभीर जखमी

झाराप तिठा येथे सर्कलचे आश्वासन देऊनही त्याची कोणतीही पूर्तता शासन स्तरावर झाली नाही. त्यानंतर या ठिकाणचे सर्कल रद्द करून मिडलकट बंद करून या ठिकाणी साळगाव हायस्कूल समोरील बॉक्सवेलकडून वाहतूक वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने या बॉक्सवेलच्या सर्व्हिस रोडची रुंदी वाढवण्यात आली. मात्र, या रुंदीकरणाचे काम अतिशय निकृष्ट करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. कामानंतर एका वर्षातच येथील डांबरीकरण उखडून गेले आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडला अनेक ठिकाणी उंच सखलपणा निर्माण झाला आहे. नवीन कामाच्या एका वर्षातच डांबरीकरण कसे उखडते हा मोठा गंभीर प्रश्न आहे.

या भागातच मुख्य महामार्गावर यापूर्वीच्या कंपनीने डांबरीकरणाचे काम केले आहे. या कामाला दोन वर्षे होऊन गेली आहेत, तरीही हे डांबरीकरण टिकून आहे. मात्र यानंतर नव्याने केलेले काम एका वर्षात उखडून गेले आहे. तसेच या सर्व्हिस रोडवर गटारावर रेलिंग बसविण्यात आले आहेत. हे रेलिंगही व्यवस्थित बसण्यात आले नाही. केवळ काम उरकण्याचा प्रकार याठिकाणी करण्यात आला आहे.

Salgaon Service Road
अखेर सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवेला हिरवा कंदील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news