Sindhudurg Ro-Ro Ferry Accident : रो-रो प्रवासी बोटीला‌‘टगबोटी‌’चा धक्का!

विजयदुर्ग बंदरातील घटना
Sindhudurg Ro-Ro Ferry Accident
रो-रो प्रवासी बोटीला‌‘टगबोटी‌’चा धक्का!
Published on
Updated on

देवगड ः विजयदुर्ग बंदरात टगबोटीचा धक्का लागल्याने ‌‘एम-2-एम‌’ प्रिन्सेस या प्रवासी फेरीबोटीला किरकोळ हानी पोहोचली. त्याची दुरुस्ती सायंकाळी उशिरा पूर्ण झाल्यानंतर ही फेरीबोट मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दुरुस्तीचा कालावधी लक्षात घेता फेरीबोट कंपनीकडून प्रवाशांनी मुंबईसाठी बुकिंग केलेल्या तिकिटाचे पैसे त्यांना परत केल्याचे व ही बोट प्रवाशांविना मुंबईला निघाल्याचे समजते.

कोकणातील जलवाहतुकीमधील मुंबई-विजयदुर्ग या पहिल्या रो-रो सेवेचा शुभारंभ 1 मार्च रोजी करण्यात आला आहे. या जलवाहतूक प्रकल्पाच्या शुभारंभाची पहिली फेरी ‌‘एम-2-एम‌’ प्रिन्सेस या प्रवासी फेरीबोटीने यशस्वी पूर्ण केली आहे. या फेरीबोटीची दुसरी फेरी बुधवारी विजयदुर्ग येथे दाखल झाली होती. गुरुवारी दुपारी ही फेरीबोट मुंबईच्या दिशेने रवाना होणार होती. याचदरम्यान विजयदुर्ग बंदरात या प्रवासी फेरीबोटीला टगबोटीचा धक्का बसला. यात प्रवासी फेरीबोटीला किरकोळ हानी पोहोचली. त्याच्या दुरुस्तीचे काम फेरीबोट व्यवस्थापनाकडून तात्काळ हाती घेण्यात आले. गुरुवारी या फेरीबोटी करिता 30 प्रवाशांनी मुंबईसाठी तिकिटांचे बुकिंग केले होते. परंतु, दुरुस्ती कारणामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाऊ नये व प्रवाशांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेत संबंधित कंपनीने प्रवाशांना त्यांचे तिकिटाचे पैसे परत केल्याचे समजते. फेरीबोटीवरील काही कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने देवगडहून खासगी ट्रॅव्हल्सने मुंबईच्या दिशेने रवाना केले. सायंकाळी उशिरा फेरीबोटीची दुरुस्ती पूर्ण होताच ही फेरीबोट मुंबईच्या दिशेने प्रवाशांविना रवाना झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news