Sindhudurg Sand Mining : अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर महसूल विभागाच्या जाळ्यात

कोळंब येथे भल्या पहाटे ३.३० वाजता धडक कारवाई; तीनही डंपरमध्ये प्रत्येकी दोन ब्रास वाळू आढळली
Sindhudurg Sand Mining
अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर महसूल विभागाच्या जाळ्यात
Published on: 
Updated on: 

मालवण : महसूल विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत गोवा पासिंगचे दोन आणि सिंधुदुर्ग पासिंगचा एक अशा एकूण तीन डंपरचा समावेश आहे. यामध्ये गोवा पासिंगचे दोन डंपर, तर सिंधुदुर्ग पासिंगचा एक डंपर पकडण्यात आला.या तिन्ही डंपरची तपासणी केली असता प्रत्येक डंपरमध्ये प्रत्येकी दोन ब्रास वाळू आढळून आली. अनधिकृतपणे वाळू वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने तिन्ही डंपर ताब्यात घेतले आहेत.

मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकामध्ये मसुरे मंडळ अधिकारी दीपक शिंगरे, कोळंब मंडळ अधिकारी मिनल चव्हाण, आचरा मंडळ अधिकारी उमेश सिंगनाथ, सुकळवाड मंडळ अधिकारी स्वप्नात जंगले, ग्राम महसूल अधिकारी खुलपे, गुरव, महसूल सेवक सत्यवान पाताडे, वैभव मसुडगे, संतोष चव्हाण आदी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.