Sindhudurg News : वेळ पडल्यास कोकणातील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल रोको

सिंधुदुर्ग रेल्वे परिषदेत इशारा; रेल्वे प्रशासनाविरोधात संताप
Sindhudurg News
कसाल : सिंधुदुर्ग रेल्वे परिषदेचे उद्‌घाटन करताना संदेश पारकर, सुप्रिया वालावलकर. (छाया :संजय वालावलकर)
Published on
Updated on

ओरोस : नाव ‘कोकण रेल्वे’, मात्र सर्व सोयी सुविधा गोवा व कर्नाटक, केरळ राज्यांना. रेल्वेभरतीतही परप्रांतीयांची भरती. ‘कोरे’ मार्गावरून धावणाऱ्या ३५ हून अधिक गाड्यांना कोकणात एकही थांबा नाही. कोकणातील प्रवाशांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात एकजुटीची वज्रमूठ दाखण्याची वेळ आली आहे. याबाबत आपण प्रवासी संघटननेमार्फत कोकणातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधुया, त्यांनी याची दखल न घेतल्यास कोकणातील सर्व स्थानकांवर ‘रेल रोको’ आंदोलने छेडूया, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या वतीने कसाल येथील साईमाऊली हॉल येथे रविवारी सिंधुदुर्ग रेल्वे परिषदेचे आयोजन केले होते. जिल्हाभरातून विविध सामाजिक संस्था, कोकण रेल्वे स्टेशन संघटना, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना, कोकणभूमी कृती समिती या बरोबरच कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील रेल्वे प्रवासी संघटनांचे प्रतिनिधींनी या सिंधुदुर्ग रेल्वे परिषदेला उपस्थित होते.

या परिषदेचे उद्‌घाटन कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, जि. प. सदस्या सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्वच मान्यवरांनी कोकण रेल्वे प्रशासन व भारतीय रेल्वेकडून कोकणातील प्रवाशी व कोकणातील रेल्वे स्थानकांबाबत दुजाभाव होत असल्याची भावना व्यक्त केली. स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत गंभीर नसल्याचा संतापही व्यक्त करण्यात आला. रखडलेले सावंतवाडी टर्मिनस, रेल्वे स्थानकांवरील मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव, दक्षिण व उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना कोकणातील स्थानकांवर थांबे देण्यास होणारी टाळाटाळ, रेल्वे नोकर भरतीत परप्रांतीयांना देण्यात येणारे प्राधान्य, प्रवाश्यांच्या अन्य मागण्यांकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था, याबाबत सर्वच मान्यवरांनी संताप व्यक्त करत, यासाठी संघटितपणे आवाज उठवण्याची गरज असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news