Sindhudurg News : गणपती उत्सव काळात टपाल विभागातर्फे विशेष ‘गणपती नाईट कॅम्प’

सणांच्या धावपळीत नागरिकांना मिळणार मोठा दिलासा
Postal service
Postal serviceFile Photo
Published on
Updated on

सिंधुदुर्गनगरी : गणपती उत्सव काळात नागरिकांना टपाल, वित्तीय, विमा आणि पार्सल सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष 'गणपती नाईट कॅम्प'चे आयोजन करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात टपाल सेवा नागरिकांच्या अधिक जवळ नेण्याचा हा अभिनव उपक्रम असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष शिबिरांमध्ये नागरिकांना टपाल विभागाच्या विविध सेवांची माहिती तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळणार आहे. मेल सेवा, पार्सल सेवा, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा, पोस्टल लाईफ इन्शुरन्स व ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक आणि नागरिक केंद्रीत सेवा यांसह विविध सुविधांची माहिती देण्यात येणार आहेत.

सुरक्षित बचत व वित्तीय सेवांची माहिती

पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेच्या माध्यमातून नागरिकांना विविध बचत योजना, ठेव व पैसे काढण्याची सुविधा, नामनिर्देशन तसेच इंटरनेट व मोबाइल बँकिंगसारख्या डिजिटल बँकिंग सुविधांची माहिती मिळणार आहे. तसेच पीएलआय आणि आरपीएलआय अंतर्गत उपलब्ध विमा योजनांची माहिती, प्रीमियम भरणा, कर्ज, रूपांतरण, समर्पण आदी सुविधांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

मेल सेवेंतर्गत स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल आणि बिझनेस मेल सोल्यूशन्स, तर पार्सल सेवेंतर्गत देशांतर्गत पार्सल बुकिंग, स्पीड पोस्ट पार्सल आणि व्यवसाय व ई-कॉमर्ससाठी उपलब्ध सेवांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय टपाल सेवेंतर्गत इंटरनॅशनल स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय एअर पार्सल आणि इंटरनॅशनल ट्रॅक्ड पॅकेट याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निर्यातदार, लघु व्यावसायिक तसेच वैयक्तिक ग्राहकांसाठी आवश्यक कागदपत्रे, पॅकेजिंग, बुकिंग व प्रेषणाबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. या विशेष शिबिरांमध्ये नागरिकांना टपाल विभागाच्या विविध सेवांची माहिती मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news