Sindhudurg News : वेंगुर्ले सभापतिपदी शंकर घारे; उपसभापतिपदी सचिन देसाई

प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध
Sindhudurg News
वेंगुर्ले सभापतिपदी शंकर घारे; उपसभापतिपदी सचिन देसाई
Published on
Updated on

मळगाव : वेंगुर्ले पंचायत समिती सभापतीपदी मातोंड गणातील भाजपचे सदस्य शंकर घारे तर उपसभापदी परुळे गणातील शिंदे शिवसेनेचे सदस्य सचिन देसाई यांची निवड करण्यात आली.

वेंगुर्ले सभापती व उपसभापती निवडणूक पंचायत समिती कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेंगुर्ले तहसीलदार ओमकार ओतारी यांच्या देखरेखीखाली झाली. सभापती पदासाठी व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच नामांकन दाखल झाल्यामुळे या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे मातोड गणातील सदस्य शंकर घारे व उपसभापतीपदी परुळे गणातील सचिन देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य संकेत धुरी, नितीन मांजरेकर, विष्णू फणसेकर, सुचिता वजरटकर, साक्षी नार्वेकर, प्रियांका घाटवळ, सुमती मसुरकर, शीतल राऊत आदी उपस्थित होते.

वेंगुले तालुक्यातील महायुतीतील भाजप व शिंदे शिवसेना यांची भाजप कार्यालयात सकाळी पार पडलेल्या संयुक्त बैठकीत भाजपचे तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी भाजपच्यावतीने सभापती पदासाठी शंकर घारे यांचे नाव जाहीर केले. तर शिंदे शिवसेनेच्या वतीन जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी उपसभापतीपदाठी सचिन देसाई याचे नाव जाहीर केले. महायुतीच्या वतीने ही निवड एक वर्षासाठी असल्याचेही जाहीर करण्यात आले. वेंगुर्ले सभापती पद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे राखीव प्रवर्गातील सदस्य शंकर घारे, सुचिता वजराटकर, नितीन मांजरेकर यांची नावे चर्चेत होती. मात्र प्रथम शंकर घारे यांना संधी देण्यात आली आहे तर नंतर उर्वरित इतर मागास प्रवर्गातील सदस्यांना संधी देण्यावर महायुतीत एकमत झाले आहे. त्यामुळे मागास प्रवर्गातील सदस्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. नवनिर्वाचित सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांचे महायुतीच्या वतीने सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई व शिंदे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी अभिनंदन केले. वेंगुर्ले उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छीमार नेते वसंत तांडेल, पेंडूर सरपंच संतोष गावडे, शिंदे शिवसेनेचे संघटक बाळा दळवी, मकरंद परब, प्रणव वायंगणकर, सुभाष सावंत, राजबा सावंत आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news