Sindhudurg politics : वेंगुर्लेमध्ये युती, आघाडी अद्याप नसल्याने संभ्रम

अनेकजण इच्छुक; दिवस कमी राहिलेत
Sindhudurg politics
वेंगुर्लेमध्ये युती, आघाडी अद्याप नसल्याने संभ्रम
Published on
Updated on

सगुण मातोंडकर

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेत निवडणूक प्रक्रिया सुरू होऊनआज चार दिवस झाले आहेत. तरीही युती आणि महाविकास आघाडीमध्ये नगराध्यक्ष उमेदवारावर एकमत होत नसल्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांवर अनिश्चिततेचे सावट असल्यामुळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संभ्रमावस्थेत आहेत.

Sindhudurg politics
Sindhudurg News : नेते युतीसाठी, कार्यकर्ते मैत्रीपूर्ण लढतीसाठी आग्रही

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन चार दिवस लोटले आहेत तरीही अद्यापपर्यंत भाजप व शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी युती तसेच उबाठा शिवसेना, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी महाआघाडी नगराध्यक्ष पदावर अजूनपर्यत घोडे अडून बसले आहे. वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत युती आणि महाविकास आघाडीतील एकूण सहा पक्षामध्ये नगराध्यक्ष पदावरून अद्यापपर्यंत एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाने इच्छुक उमेदवारांची चाचणी सुरूच ठेवली आहे.

वेंगुर्ले नगरपरिषदेचे थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण प्रथमच 21 वर्षांनंतर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे. तसेच थेट नागरिकातून नगराध्यक्ष निवडणुकीत पहिले सर्वसाधारण आपल्या परिवारातील नगराध्यक्ष पद असल्यामुळे प्रत्येक पक्षात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या संख्येत वाढ झालेली आहे.वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत भाजप व शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी युतीची घोषणा लांबणीवर पडली आहे. तसेच उबाठा शिवसेना, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडी यांच्या इच्छुक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे.

वेंगुर्ले नगरपरिषदेवर 2016 मध्ये वेंगुर्ले नगर परिषदेच्या 8 प्रभागातून 17 नगरसेवक असताना भाजपचा नगराध्यक्ष होता. आता वेंगुर्ले नगरपरिषदेचे 10 प्रभाग आहेत. 10 प्रभागात 20 नगरसेवक असणार आहेत. या प्रभागातून थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. भाजपने नगराध्यक्ष पदावर माजी नगराध्यक्ष राजन गिरप, सुहास गवंडळकर, बाळू देसाई यांची नावे आहे. शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश देऊन नागेश गावडे यांच्या नावासह सुनिल डुबळे व उमेश येरम यांची नावे आहेत. तर महाविकास आघाडीत उबाठा शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात नगराध्यक्ष पदावर एकमत नाही. काँग्रेसने विलास गावडे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी निश्चित केले. तर उबाठा शिवसेनेने माजी नगराध्यराक्ष संदेश निकम, शरद पवार राष्ट्रवादीकडून नितीन कुबल यांचे नाव निश्चित केले आहे. त्यामुळे सध्या तरी दोन्ही आघाड्यात नगराध्यक्ष पदावर एकमत नाही.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी स्वबळासाठी भाजप, शिंदे शिवसेना, उबाठा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची तयारी आहे. तरी राजकीय पक्षात आघाडी होण्याबाबत सुतोवातवरीष्ठ पदाधिकार्‍यांनी दिला आहे. पण स्थानिक पातळीवर युतीत तसेच महाविकास आघाडीत सुसंवाद नसल्याने नगराध्यक्षपदावर एकमत नाही.

वेंगुले नगरपरिषद निवडणुकीत भाजप व शिंदे शिवसेना एकमेकासमोर निवडणूका लढवण्याच्या तयारीत आहेत. तर महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याने उबाठा शिवसेना व काँग्रेस,शरद पवार राष्ट्रवादी या पक्षाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करून निवडणूक रंगणात स्वबळावर उतरण्याची तयारी ठेवलीआहे. त्यामुळे वेंगुले नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची चुरशीच्या होण्यार्‍या निवडणुकीत भाजप व शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी तसेच उबाठा, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी मधील इच्छुक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला आहे.

Sindhudurg politics
Sindhudurg politics : मालवणात भाजपचा शिवसेनेला 16-4 चा प्रस्ताव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news