Sindhudurg Police Transfers
कणकवली : नूतन पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांचे स्वागत करताना अधिकारी व कर्मचारी.(Pudhari Photo)

Sindhudurg Police Transfers | सिंधुदुर्गातील 7 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

कणकवली पोलीस निरीक्षकपदी अतुल जाधव यांची नियुक्ती
Published on

कणकवली : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी जिल्ह्यातील सात पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्यांंतर्गत बदलीचे आदेश काढले आहेत. यामध्ये कणकवली पोलिस निरीक्षकपदी प अतुल जाधव यांची तर कणकवलीत कार्यरत असलेले मारूती जगताप यांची मालवण पोलीस निरीक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे.

मालवणचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विजयदुर्गचे पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांची वैभववाडी पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Sindhudurg Police Transfers
Kankavli Political News | युवक राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडुलकर

बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे यांची जिल्हा विशेष शाखा, कुडाळचे एपीआय गजेंद्र पालवे यांची बांदा पोलीस ठाणे प्रभारी पदी, सावंतवाडीचे एपीआय संजय कातीवले यांची विजयदुर्ग पोलीस ठाणे प्रभारीपदी आणि कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची स्थानिक गुन्हे शाखा येथे बदली झाली आहे.

Sindhudurg Police Transfers
Banda : बांद्यात ८१ हजारांची दारू; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news