

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस ग्रामसंवाद सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वेंगुर्ले पोलीस स्थानकाच्या वतीने आरवली येथील श्री देव वेतोबा देवस्थान, अन्नशांती सभागृह येथे आज शनिवारी (दि.११) सकाळी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ व आरवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांना यावेळी सायबर गुन्ह्यांबाबत, वाहतूक सुरक्षा, नियमांबाबत, लोकांच्या सूचना व समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामस्थांच्या विविध प्रश्नाबाबत परिसंवाद संपन्न झाला. यावेळी आरवली श्री देव वेतोबा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष जयवंत राय , आरवली उपसरपंच किरण पालयेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मेस्त्री, तातोबा कुडव, तलाठी सतिश गावडे, कोतवाल संजय मेस्त्री आदी उपस्थित होते.