Sindhudurg Crime : ओवळीये कोलेरी वाडी येथील प्रवीण परब यांचा शाॅक लागून मृत्यू

ओवळीये गावावर शोककळा
Sindhudurg Crime News
ओवळीये कोलेरी वाडी येथील प्रवीण परब यांचा शाॅक लागून मृत्यू
Published on: 
Updated on: 

कणकवली : मालवण तालुक्यातील ओवळीये कोलेरीवाडी येथील कुमार प्रवीण विठ्ठल परब हा गोवा येथून गणपतीसाठी आपल्या घरी आला होता. मात्र, मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी विद्युत शाॅक लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच तो मृत झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

त्याचे पश्चात आई, वडील, एक भाऊ, काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे. कुमार प्रवीण याच्या अकाली जाण्याने ओवळीये गावावर शोककळा पसरली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news