Sindhudurg News : ओसरगाव टोल नाक्यावर ‌‘एमएच 07‌’ पासिंग गाड्यांना टोलमाफी!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती
Nitesh Rane
Nitesh Rane (Pudhari File Photo)
Published on
Updated on

सावंतवाडी : ओसरगाव येथील टोल नाक्यावर सिंधुदुर्गवासीयांना कोणत्याही प्रकारचा टोल लागू होणार नसून या टोल नाक्यावर ‌‘एमएच 07‌’ पासिंग गाड्यांवर टोल आकारणी होणार नाही. अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले उपस्थित होते. ना. राणे म्हणाले, जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत यांनी स्थानिक वाहनांना टोलमाफी मिळावी, असे निवेदन मला दिले आहे. मी आमदार असताना सिंधुदुर्ग वासियांच्या हक्कासाठी हा टोल बंद पाडला होता. आता तर मी पालकमंत्री आहे, यामुळे टोल नाका सुरू झाला तरी या टोल नाक्यावरून सिंधुदुर्ग पासिंगच्या एकाही वाहनांवर टोल लागू होणार नाही याची दक्षता मी घेतली आहे. ओसरगाव टोलवर सिंधुदुर्ग वासीयांना टोलमाफी मिळणारच हा नितेश राणे यांचा शब्द आहे. चिंता करू नका, असे ते म्हणाले.

मराठी येत नाही, त्यांना मराठी शिकवू

भाजपचे सरकार सत्तेत असताना तरी निदान हिंदूंना मारण्याची धमकी कोणी आम्हाला देऊ नये. सर्वांनी सरकारच्या नियमांचे पालन करायचे आहे. ज्यांना मराठी येत नाही त्यांनी मराठी शिकावी, त्यासाठी लागेल ती मदत करू, असे राणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news