Sindhudurg Crime : पत्नीने रोख रकमेसह दागिने चोरले!

पतीच्या तक्रारीवरून पत्‍नीविरुद्ध गुन्हा
Crime
Crime Pudhari
Published on: 
Updated on: 

कणकवली : आपली पत्‍नी सौ. जान्हवी ऊर्फ राधिका महादेव चव्हाण (सध्या रा. धामोड, ता. राधानगरी) हिने शुक्रवारी रात्री ८ वा. च्या सुमारास आपले घरी नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथे येऊन आपल्‍या व आईच्या संमतीशिवाय रोख रक्‍कम ५५ हजार आणि १५ हजारांची ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा मिळून ७० हजारांचा ऐवज चोरून नेला तसेच आपणास व आईवडिलांना शिवीगाळ केली, अशी तक्रार जयेंद्र लक्ष्मण चव्हाण (३२, रा. नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट) यांनी कणकवली पोलिसांत दिली. त्‍यानुसार जान्हवी ऊर्फ राधिका महादेव चव्हाण हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयेंद्र चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार ते गवंडी काम करतात, १९ मे २०२६ रोजी त्‍यांचा विवाह धामोड राधानगरी येथील राधिका महादेव चव्हाण हिच्यासोबत झाला होता. लग्‍नानंतर काही महिन्यांनी त्‍यांच्यात वाद सुरू झाले, त्‍यातून पत्‍नी सौ. जान्हवी हिने गणेश चतुर्थीच्या अगोदर तीन दिवस घर साफसफाई करण्यावरून वाद करून परत नांदायला येणार नाही असे सांगून भांडण करून ती माहेरी गेली. त्‍यानंतर तिने संपर्क केला नाही.

शुक्रवारी २ ऑक्‍टोबर रोजी सायं. ७.३० वा. च्या सुमारास ती ओळखीच्या नातेवाईकांना घेवून घरी आली. कोणालाही न विचारता कपडे व घरातील कपाटातील सामान बॅगेत भरले, जाताना आईवडिलांना शिवीगाळ केली आणि रात्री ८ वा. च्या सुमारास कपड्याची बॅग घेवून निघून गेली. त्‍यानंतर काही वेळाने जयेंद्र यांच्या आई सुभद्रा हिने कपाटात ठेवलेली सोन्याची अंगठी व रोख रक्‍कम पाहिली असता ती दिसून आलेली नाही. त्‍यामुळे ती पत्‍नी सौ. जान्हवी ऊर्फ राधिका चव्हाण हिने चोरून नेल्‍याची तक्रार जयेंद्र चव्हाण यांनी कणकवली पोलिसांत केली. त्‍यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news