

ओरोस : भुईबावडा शाळेचे मुख्याध्यापक संजय राठोड यांच्या बोगस कागदपत्र प्रकरणे संबंधित दोशींवर कारवाई करण्यास माध्यमिक विभाग जबाबदार असून चौकशी समितीचा अहवाल बोर्डाच्या अहवालावर अवलंबून असून राठोड हेच माध्यमिक शिक्षण विभागाचे एजंट आहेत या प्रकरणातील अन्य २४ जणांवर कधी कारवाई करणार असा प्रश्न सदस्य प्रमोद रावराणे यांनी शिक्षण समिती सभेत लावून धरला जर यावर योग्य ती कारवाई न झाल्यास जि.प.च्या सर्वसाधारण सभेत आपण एसआयटी चौकशीची मागणी करू असा इशाराही दिला आहे .
सिंधुदुर्ग नगरी येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जि . प .शिक्षण समितीची सभा सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदस्य प्रमोद रावराणे, प्राची ईश्वरकर, नितीन राऊळ, यज्ञा साळगावकर,अपर्णा सातोसकर, रामा गवस आदी सदस्य प्रभारी शिक्षणाधिकारी सविता परब व खाते प्रमुख उपस्थित होते
यावेळी झालेल्या बैठकीत वैभववाडी उंबर्डे येथील कॉपी प्रकरणाच्या चौकशी बाबत सदस्य प्रमोद रावराणे यांनी माध्यमिक विभाग कशा पद्धतीने पाठीशी घालत आहे आणि संजय राठोड यांचे मुख्याध्यापक पद वाचविण्यात हातभार लावत आहेत याचा पाढा वाचत माध्यमिक विभागाच्या माध्यमातून गेलेली समिती ही माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाच्या अहवालावर अवलंबून काम करत आहे अनेक चुकीचे कागदपत्र अहवाल सादर करून चक्क माध्यमिक शिक्षणाधिकारी पाठीशी घालत असल्याचे सांगतसंबंधित शाळेच्या समितीने दिलेला अहवालाचा विचार न करता प्रत्यक्षदर्शी घडलेल्या घटनेवर आधारित कार्यवाही व्हायला हवे २० /२१ या आर्थिक वर्षापासून आतापर्यंत मुख्याध्यापक राठोड यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही तत्कालीन सभापती यांनी हा विषय त्यावेळी लावून धरला होता या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून या गुन्ह्यातील दोषींवर कारवाई करताना पोलीस कोणकोणती कलमे कशा पद्धतीने लावतात याची आपल्या जिल्हा परिषदेच्या वकिला मार्फत माहिती घेऊन त्याप्रमाणे पोलिसांकडे अहवाल देणे क्रमप्राप्त आहे परंतु माध्यमिक विभागाच्या एजंट राठोड याच्यावर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभाग डोळेझाक करत आहे पाठीशी घालत आहे आणि मुख्याध्यापक पद वाचविण्यात प्रयत्नशील आहेतया प्रकरणातत जे जे दोषी आहेत त्यांची नावे पुढील शिक्षण समिती ते उघड करू जिल्ह्यात असे अनेक प्रकार सुरू असल्याचेही सांगताना या परीक्षा कालावधीतील पेपर पुरवणी बाहेर गेलीस कशी यापासूनच्या संपूर्ण चौकशीबाबत अन्य २४ जणांवर कारवाई कधी होणार असा प्रश्नही रावराणे यांनी उपस्थित केला.
जिल्ह्यातील शून्य पटसंख्येच्या शाळांबाबत आणि ज्या शाळेत मुले आहेत त्या शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता आहे पटसंख्या घटल्यामुळे त्याचा शैक्षणिक कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घेऊन ज्या शाळेमध्ये एक दोन मुले आहेत त्या शाळेचा अहवाल गटशिक्षणाधिकारींनी तात्काळ पुढील बैठकीत सादर करावा जेणेकरून एक गाव एक शाळा ही संकल्प नाप्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि ज्या दुर्गम भागातील शाळा आहेत त्यांना सुद्धा न्याय दिला जावा याचाही विचार करण्यात येईल जिल्हा परिषदेच्या ज्या मॉडेल शाळा आहेत त्यांचाही अहवाल सादर करावा असेही सभापती प्रितेश राऊळ यांनी सांगितले
भुईबावडा हायस्कूलचे अनुकंपा मधील शिपाई कर्मचारी यांना सेवेत घेण्याबाबत अनेक त्रुटी दाखविले जात आहेतअनुकंपा असूनही त्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करत आहे या प्रकाराला आपण गंभीर दखल घेऊन जर शिपाई कर्मचारी याला सेवेत न घेतल्यास अनेक प्रकरणे उघडे काढून तात्काळ निर्णय घ्या असे सूचित केले .
जिल्ह्यात अनेक शाळा नादुरुस्त अवस्थेत असून पटसंख्या अभावी शाळांची दुरुस्ती होत नाही असा प्रश्न सदस्य रामा गवस यांनी मांडला तर खारेपाटण शाळेचा दुरुस्तीबाबतही सदस्या प्राची इस्वलकर यांनी प्रश्न उपस्थित करून जिल्ह्यात अनेक शाळा नादुरुस्त अवस्थेत आहेत त्या तात्काळ दुरुस्त होण्याबाबत प्रस्ताव जिल्हा नियोजन कडे पाठवावा अशी ही सूचना केली यावर जिल्ह्यात ३१० शिक्षकांची पदे रिक्त असून २८ २ उपशिक्षक भरती कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे दोन महिन्यात नवीन शिक्षक मिळतील असेही सभापती प्रितेश राऊळ यांनी स्पष्ट केले