Uday Samant : सिंधुदुर्गमध्ये ‘बोलीभाषा रिसर्च सेंटर’ : सामंत

कुडाळमध्ये लवकरच ‘मालवणी भवन’ उभारणार
Uday Samant
Uday SamantPudhari Photo
Published on
Updated on

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेने बीएलए नियुक्त करून आदर्शवत काम केले आहे. बीएलएच्या माध्यमातून जिल्ह्यात शिवसेना संघटन अधिक मजबूत करा. शिवसेना जिल्ह्याच्या विकासासाठी १०० टक्के कटिबद्ध आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात आ. नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवणी भवन येत्या काळात उभारले जाईल, आजूबाजूच्या बोलीभाषेचे रिसर्च सेंटरही जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. पहिले स्किल सेंटरही जिल्ह्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

आ. दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात सिंधुरत्न योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या अंतर्गत ४०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. शिवसेेनेच्या बीएलए पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी सायंकाळी कुडाळ महालक्ष्मी हॉल सभागृहात झाली. यावेळी मंत्री उदय सामंत बोलत होते. आ. नीलेश राणे, आ. दीपक केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख बाळा चिंदरकर, उपनेते संजय आंग्रे आदींसह बीएलए पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news