Sindhudurg Fire : तारकर्ली एमटीडीसी कार्यालय आगीत खाक

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज ; लाखो रुपयांचे नुकसान
Sindhudurg Fire
तारकर्ली एमटीडीसी कार्यालय आगीत खाक
Published on
Updated on

मालवण : तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कार्यालयाला सोमवारी पहाटे भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीच्या भडक्यात संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले.आग लागल्याचे लक्षात येताच कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठया प्रमाणात भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. घटनेची माहिती मिळताच मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शर्तीचे प्रयत्न करून अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आगीत एमटीडीसी कार्यालयातील संगणक, फर्निचर, कागदपत्रे तसेच अन्य कार्यालयीन यंत्रणा जळून खाक झाल्या. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे कार्यालय लाकडी बोटीच्या प्रतिकृतीच्या स्वरुपात उभारण्यात आले होते. लाकडी बांधकाम असल्यामुळे सर्व जळून गेले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायविंग अँड ॲक्वाटिक स्पोर्ट्स (इसदा) च्या प्रभारी व्यवस्थापक दीपिका वस्त यांनी घटनेची पाहणी केली. यावेळी तलाठी ज्ञानेश्वर वायाळ यांनी आगीचा पंचनामा केला. आग विझविण्यासाठी एमटीडीसीचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ विजय टक्के, सिद्धेश चव्हाण, धनंजय झाड, जितेश वस्त, नितीन कोळंबकर, राहुल करलकर, संदीप मालवणकर, विशाल गोसावी, योगेश देऊलकर, सत्यवान देऊलकर, किशोर आडारकर, कुणाल बापर्डेकर, थॉमसन फर्नांडिस, कमलेश नाईक, अक्षय भगत, सुलक्षण पाटकर, संतोष शेवाळे, देवेंद्र मयेकर, नंदकुमार जोशी, जयवंत सावंत, संतोष झाड, गणेश साळगावकर, राघोबा गोसावी यांसह अन्य नागरिकांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news