Sindhudurg News : डंपरच्या धडकेत श्री स्वयंभू नागनाथ मंदिराची कमान जमीनदोस्त!

तेरवण - मेढे ग्रामस्थांमधून संताप; रस्ता ठेकेदाराकडून कमान पूर्ववत बांधून देण्याची ग्वाही
Sindhudurg News
डंपरच्या धडकेत श्री स्वयंभू नागनाथ मंदिराची कमान जमीनदोस्त!
Published on
Updated on

दोडामार्ग : तेरवण-मेढे येथील श्री स्वयंभू नागनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावरील कमान तिलारी ते वीजघर रस्त्याच्या कामावरील ठेकेदाराच्या डंपरच्या धडकेत जमीनदोस्त झाली. या घटनेमुळे ग्रामस्थ व भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी जाब विचारल्यानंतर नुकसानग्रस्त कमान नव्याने बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतरच वादावर पडदा पडला.

तिलारी ते वीजघर मार्गावरील काँक्रिटीकरण कामावर कार्यान्वीत डंपर सोमवारी सायंकाळी रिव्हर्स घेत असताना चालकाचा अंदाज चुकला. या डंपरची जोरदार धडक मंदिराच्या कमानीला बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की कमानीचा मोठा भाग कोसळून ती पूर्णपणे उध्वस्त झाली. श्री स्वयंभू -नागनाथ हे तेरवण-मेढे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. त्यामुळे देवस्थानाच्या प्रवेशद्वाराचे नुकसान झाल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

धार्मिक भावना दुखावल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, ठेकेदाराने ग्रामस्थांची समजूत काढत नुकसानग्रस्त कमान पूर्ववत व अधिक भक्कम स्वरूपात उभारून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी संयमाची भूमिका घेत प्रकरण शांत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news