Sindhudurg News : घोडगे-मळेवाडी येथे रस्त्यालगतचा भराव खचला

तालुक्यात गेल्या चौवीस तासांत १८ मि.मी. पावसाची नोंद
Sindhudurg News
घोडगे-मळेवाडी येथे रस्त्यालगतचा भराव खचला
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घोटगे -मळेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर नजिकच्या रस्त्यालगतचा मातीचा भराव खचून अतिवृष्टीत वाहून गेल्याने रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान तालुक्यात आणखी काही घरांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. दरम्यान तालुक्यात गेल्या २४ तासात १८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यात गेले दोन दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी त्याआधी झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले आहे. घोटगे -मळेवाडी श्री विठ्ठल मंदिर नजिकच्या रस्त्याचा भराव तेथील ओहोळाच्या पाण्याने खचला. रस्त्यालगतच्या मातीचा भराव काही प्रमाणात वाहून गेल्याने तेथे रस्त्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तेथे रस्त्यालगत ओहोळाचे पात्र असून मुसळधार पावसात ओहोळाच्या पाण्याचा प्रवाह रस्त्यालगत वाहत असतो. त्यामुळे तेथे संरक्षक भिंत उभारण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे. माजी सरपंच अमोल तेली व सुधीर नाईक यांनी खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. तसेच जि.प. माजी सदस्य लाॅरेन्स मान्येकर व आपण पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधून सदर ठिकाणी संरक्षक भिंतीची मागणी करणार असल्याचे अमोल तेली यांनी सांगितले.

पावशी- मिटक्याचीवाडी येथील गणपत दत्ताराम पाताडे यांच्या शौचालयावर काजूचे झाड पडून सुमारे २५ हजार रू.चे नुकसान झाले. तेंडोली येथील भिकाजी शंकर परब यांच्या शेत मांगरावरील सिमेंटचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून १५ हजार रू.चे नुकसान झालेे. पोखरण पशुवैद्यकीय  दवाखानाच्या इमारतीवर आकेशीया वृक्ष कोसळून पाच हजार रू.चे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news