Sindhudurg News : गोवा दारू विरोधात सिंधुदुर्ग पोलिस सतर्क

तीन कारवायांमध्ये ४ लाखांची गोवा दारू, दोन कार जप्त
Sindhudurg News
गोवा दारू विरोधात सिंधुदुर्ग पोलिस सतर्कFile Photo
Published on
Updated on

सावंतवाडी / वेंगुर्ले : जिल्हा पोलिसांनी शनिवारी रात्री व रविवारी सकाळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल केले. या तीनही कारवाईमध्ये मिळून सुमारे ४ लाखांची गोवा दारू तसेच या दारू वाहतुकीसाठी वापरलेली दोन वाहने जप्त केली. जिल्हा अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण तसेच पोलिसांच्या पथकांनी या कारवाई केल्या.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सावंतवाडी - तळवडे मार्गावरील गडगेवाडी तळी स्टॉप येथे गोवा दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत ६ लाख ७१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एक मारुती स्विफ्ट कार आणि सुमारे १ लाख ७१ हजार ८४० रुपयांची गोवा दारू हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी मनवेल फिलीप्स फर्नांडिस (रा. सातार्डा, ता. सावंतवाडी) व मेलवीन फर्नांडिस (रा. गोवा) यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

दुसरी कारवाई सावंतवाडी पोलिसांनी आंबोली पोलिस लाठी येथे कारवाई करत ४८,९६० रुपयांची गोवा दारू जप्त केली. याप्रकरणी गोपीनाथ दगडू शितोळे (वय ४०, रा. गणेशवाडी, ता. दौंड, जि. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दारू वाहतुकीसाठी वापरलेली टाटा सुमो गाडी जप्त केली. तिसरी कारवाई वेंगुर्ला पोलिसांनी वेतोरे - देऊळवाडी येथे अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई करत १ लाख ७९ हजार रुपये किमतीची गोवा दारू जप्त केली. शनिवारी २० जून रोजी रात्री ११ वा.सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news