Sindhudurg Crime : ९२ लाखांच्या खवले मांजराच्या खवल्यांसह चौघेजण जेरबंद

सिंधुदुर्गनगरी पोलिसांची कारवाई
Sindhudurg Crime News
खवले मांजर
Published on
Updated on

सिंधुदुर्गनगरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत सुमारे ९२ लाख रुपये किमतीची दुर्मीळ खवले मांजराची (पँगोलिन) खवले, सांबराची शिंगे तसेच दोन दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणी चारजणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रानबांबुळी-अणावकरवाडी परिसरात वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर खरेदी-विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार २९ मे रोजी सकाळी सुमारे ११.४० वा. च्या सुमारास सापळा रचून छापा टाकण्यात आला. या कारवाईत १ किलो ८०० ग्रॅम वजनाची खवले मांजराची खवले, सांबराची दोन शिंगे तसेच दोन मोटारसायकली असा एकूण ९२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गणेश प्रदीप शिर्के (३०, रा. पडवे, ता. कुडाळ), विठोबा भगवान बावळेकर (८२, रा. रानबांबुळी), शंकर यशवंत तारापूरे (३१, रा.पडवे) आणि कालिदास दत्तात्रय वारंग (५५, रा. सुकळवाड, ता. मालवण) यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक मोहन दहिकर व अति.पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news