Sindhudurg Rain : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

भात पेरणीसाठी बळीराजा सज्ज; दमदार पावसाची प्रतीक्षा
Sindhudurg Rain Updates
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
Published on
Updated on

कणकवली : जून महिना उजाडला, तरी पाऊस सुरू न झाल्याने चिंतेत असलेल्या बळीराजाला बुधवारी काहीसा दिलासा मिळाला. दुपारी १२ वा.पासून सुमारे तासभर जिल्ह्याच्या सर्वच भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकरी भात पेरणीस सुरुवात करणार आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत मान्सून केरळम्‌मध्ये दाखल होईल. कोकणात मान्सून दाखल होण्याची अपेक्षित तारीख १० जून आहे. यंदा मान्सूनवर ‘अल निनो’चा प्रभाव आहे. बुधवारी जिल्ह्यात मान्सूनपूर्व सरी कोसळल्या. पहाटेपासून वातावरण बदलले, पहाटेच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या. दुपारी ११.३० वा.च्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पेरणीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता पेरणीच्या कामाला लागणार आहे.

वीज पडल्याने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे नुकसान

कणकवलीत एसटी वर्कशॉपकडील गणपती मंदिरानजीक एका अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या माडाच्या झाडावर वीज पडली, बाजूलाच असलेल्या ट्रान्स्फॉर्मरवर वीज पडल्याने अधिक दाबाने वीजपुरवठा झाला, त्यामुळे त्या अपार्टमेंटच्या काही फ्लॅटमधील नागरिकांची काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news