Sindhudurg News | सुकलेल्या भातशेतीची पालकमंत्र्यांकडून पाहणी

शेतकऱ्यांना दिलासा : शासनाकडून मदतीसाठी प्रयत्न करणार
Sindhudurg News
सुकलेल्या भातशेतीची पालकमंत्र्यांकडून पाहणी
Published on
Updated on

नांदगाव : दै. ‘पुढारी’ व न्यूज चॅनलने सिंधुदुर्ग जिल्हातील पाऊस एकाकी गायब झाल्याने मळयात भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतकरी सध्या इकडून तिकडून पाणी आणून लावणी उरकत आहे.पण पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील विविध भागात जमीन सुकून भेगा पडण्याबरोबर भाताची रोपेही करपायला लागली असल्याचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर या वृत्ताची दखल घेत मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.नितेश राणे यानी कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांसमवेत पाहणी केली.

माजी जि.प.सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार,कणकवली मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर,मिलिंद मेस्त्री,माजी सभापती बंडया मांजरेकर,जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उप कृषि अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रविण ओहळ, मंडल कृषी अधिकारी अर्जुन जाधव, उपसरपंच संदीप घाडी, ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी पेडणेकर, कृषी सेवक गजानन पवार,भात संशोधन केंद्र फोंडाघाटचे डॉ.विजय कुमार शेटये, पोलिसपाटील चंद्रकांत चव्हाण, मिठबाव सरंपच भाई नरे,ग्रा.पं.सदस्य रिया चव्हाण,राजू जठार, दिनेश मुद्रस,रविंद्र चव्हाण, सुनील चव्हाण, देविदास चव्हाण, सिद्धेश जगताप, विठोबा चव्हाण, राजेश भोगले, राजू वळंजू, अशोक भोगले, अजय चव्हाण, मारुती वळंजू आदी उपस्थित होते.

पाहणीवेळी शेतकरी देविदास चव्हाण याना मंत्री ना.राण यांनी बोलावून घेत त्याच्या सोबत बांधावर जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित कृषी अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news