Sindhudurg News : ओटवणेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे दिमाखात लोकार्पण

आ. निलेश राणे व आ. दीपक केसरकरांच्या उपस्थितीत सोहळा
Sindhudurg News
ओटवणेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे दिमाखात लोकार्पण
Published on
Updated on

सावंतवाडी : ओटवणे येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. आमदार डॉ. निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.

यावेळी शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना आ. नीलेश राणे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही माती त्याग, बलिदान आणि शौर्याची ग्वाही देते. या मातीत आपण जन्मलो आणि राहतो, हे आपले परमभाग्य आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला आमंत्रित केले जाणे, हे मी माझे भाग्य समजतो," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पुतळा उभारणीसाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल 'देऊळवाडी मित्रमंडळा'चे कौतुक केले.

आमदार दीपक केसरकर यांनी ओटवणे गावावरील प्रेमापोटी आपण व्यस्त वेळापत्रकातूनही येथे उपस्थित राहिल्याचे आवर्जून सांगितले. याशिवाय, पुतळ्याच्या परिसरात आपल्या आमदार निधीतून 'हायमास्ट' दिवे बसवून देण्याची महत्त्वपूर्ण ग्वाही आ. केसरकर यांनी यावेळी दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभम धुरी तर दशरथ शृंगारे यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news