सिंधुदुर्ग : नांदगाव तिठ्ठा येथे विद्यार्थ्यांनी भरविला बाजार

स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Student market
विद्यार्थ्यांनी रानभाजांसह ग्रामीण शेतमालाची विक्री केली.Pudhari News Network
Published on
Updated on

नांदगाव  : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे माध्यमिक प्रशालेच्या वतीने 'शिक्षण सप्ताह' अंतर्गत 'कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस' साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विक्री कौशल्य व विपणन कौशल्य (मार्केटिंग) विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, यासाठी हायस्कूल तर्फे ग्रामीण शेतमालाची खरेदी-विक्री बाजाराचे आयोजन नांदगाव तिठ्ठा येथे करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रानभाजांसह ग्रामीण शेतमालाची विक्री केली. या उपक्रमास स्थानिक नागरिकांसह इतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Student market
सिंधुदुर्ग : वसोली-विरवाडी येथील पुलावरून गेली मोटरसायकल वाहून

या बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या, गावठी पीठ, कोकणी मेवा, रानमेवा, गावठी तांदूळ, गावठी अंडी, गावठी कोंबडी इत्यादी विविध प्रकारच्या मालाची विक्री सुरू केली. यासाठी सरस्वती हायस्कूल नांदगावचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यानी विशेष मेहनत घेतली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news