

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील दामिनी पालव खूनप्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, या प्रकरणात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी बुधवारी दामिनी पालव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र, या भेटीदरम्यान तसेच आतापर्यंतच्या तपासात विशेष नवीन माहिती हाती लागली नसल्याचे पोलिस निरीक्षक बडवे यांनी स्पष्ट केले.
दामिनीवर वार करण्यासाठी संशयिताने वापरलेला चाकू चाकू घटनास्थळापासून काही अंतरावर आढळून आल्याची माहितीही श्री. बडवे यांनी दिली. या प्रकरणातील घटनाक्रम आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिस पुढील तपास करीत आहेत. दामिनी पालव यांच्यावर चाकूने दहा पेक्षा अधिक वार करण्यात आल्याचे दत्तात्रय बडवे यांनी स्पष्ट केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस यंत्रणेकडून तपास सुरू आहे.
घटनास्थळावरून हस्तगत केलेला चाकू तसेच या प्रकरणाशी संबंधित अन्य पुराव्यांच्या आधारे पुढील तपासाला दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी बुधवारी दामिनी पालव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र, या भेटीदरम्याच्या तपासात विशेष नवीन माहिती हाती लागली नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील संशयित साहिल धुरी याची पोलिस कोठडी २४ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे त्याच्या कोठडीच्या कालावधीत तपासादरम्यान काही नवीन बाबी समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.