Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात जूनमध्ये सरासरीच्‍या केवळ ५७.६ टक्‍केच पाऊस

गेल्या १२५ वर्षांतील सर्वात कमी पाऊस
Sindhudurg Rain
Sindhudurg Rain
Published on
Updated on

कणकवली : अल निनोच्‍या प्रभावामुळे यंदा देशभर सरासरीच्‍या ९० टक्‍केच पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तवला असतानाच यंदा जूनमध्ये सिंधुदुर्गात सर्वसाधारण सरासरीच्‍या केवळ ५७.६ टक्‍केच पाऊस पडला आहे. गतवर्षी जूनमध्ये ६६६.२ मि.मी. म्‍हणजेच सरासरीच्‍या ७५.७ टक्‍के पाऊस झाला होता. म्‍हणजे गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा जूनमध्ये सर्वसाधारण सरासरीच्‍या १८ टक्‍के पाऊस कमी झाला आहे. गेल्‍या १२५ वर्षांतील जूनमध्ये पडलेला हा पाऊस सर्वात कमी पाऊस आहे. यापूर्वी सन १९०१ चा जून महिना असा कोरडा गेल्याची नोंद आहे.

यंदा मृग नक्षत्राच्‍या प्रारंभी ६ जूनपासून पावसाला प्रारंभ झाला. दोन-तीन दिवस पाऊस झाल्‍यानंतर नंतर पुन्‍हा पाऊस गायब झाला. दरम्‍यानच्‍या काळात शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्‍यानंतर २१ जूनपासून पावसाला प्रारंभ झाला. तेव्‍हाही चार दिवस कमी अधिक प्रमाणात पाऊस पडल्‍यानंतर पुन्‍हा पावसाने दडी मारली. त्‍यानंतर २८ जूनपासून पावसाने पुन्‍हा कमबॅक केले. त्‍यापासून आतापर्यंत सलग पाऊस सुरू आहे. पाऊस सक्रिय झाल्‍याने आता शेतकऱ्यांनी भात लावणीच्‍या कामाला प्रारंभ केला आहे. जूनमध्ये देवगड तालुक्‍यात सर्वाधिक तर मालवण तालुक्‍यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. मंगळवारी जिल्‍ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी संतधार पाऊस झाला. त्‍यात घरांवर फांद्या पडण्याच्‍या तर काही ठिकाणी पडझडीच्‍या घटना घडल्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news