Sindhudurg News : गणेशोत्सवानंतर सागरी पर्यटनाला दमदार सुरुवात!

सिंधुदुर्ग किल्ला दर्शनासह स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडांचा थरार; पर्यटक बेहद्द खूष
Sindhudurg News
मालवण : येथे पर्यटक आनंद घेण्यासाठीही पर्यटक उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. (छाया :उदय बापर्डेकर)
Published on: 
Updated on: 

उदय बापर्डेकर

मालवण : गणेशोत्सवाची धामधूम ओसरताच पर्यटननगरी मालवणमध्ये सागरी पर्यटनाला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. सिंधुदुर्ग किल्ला दर्शनासाठी होडी सेवा सुरू झाली असून, स्कुबा डायव्हिंगसह विविध वॉटरस्पोर्ट्सही सुरू झाल्याने समुद्रकिनारी पर्यटकांची रेलचेल वाढू लागली आहे. किल्ला दर्शन आणि जलक्रीडांचा मनसोक्त आनंद लुटताना पर्यटक बेहद्द खूष होत असल्याचे चित्र सध्या मालवणमध्ये पाहायला मिळत आहे.

मालवणमधील सागरी पर्यटनाचा हंगाम शासकीय नियमानुसार १ सप्टेंबर ते २५ मे असा असतो. गत हंगाम २५ मे रोजी संपल्यानंतर पावसाळी कालावधीत सागरी पर्यटन बंद ठेवण्यात आले होते. १ सप्टेंबरपासून नवीन पर्यटन हंगाम सुरू झाला असला, तरी पाऊस आणि समुद्राची खवळलेली स्थिती लक्षात घेऊन हवामानाचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने किल्ला होडी सेवा आणि जलक्रीडा सुरू करण्यात आल्या.

गणेशोत्सव काळात स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचा ओघ तुलनेने कमी होता. मात्र, गणेशोत्सवाची सांगता होताच मालवणकडे पर्यटकांची पावले पुन्हा वळू लागली आहेत. सध्या सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाला पर्यटकांची विशेष पसंती मिळत असून, किल्ला पाहिल्यानंतर स्कुबा डायव्हिंग तसेच अन्य जलक्रीडांचा आनंद घेण्यासाठीही पर्यटक उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news