Sindhudurg News : मालवण मच्छीमार्केट स्वच्छतागृहात दुर्गंधीचे साम्राज्य

उबाठा शिवसेना नगरसेवकांकडून वस्तुस्थितीचा स्पॉट पंचनामा
Sindhudurg News
मालवण मच्छीमार्केट स्वच्छतागृहात दुर्गंधीचे साम्राज्य
Published on
Updated on

मालवण : मालवण नगरपालिकेतील ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार ओरसकर आणि तपस्वी मयेकर यांनी मालवण शहरातील मच्छी मार्केटची पाहणी करून स्पॉट पंचनामा करत मार्केटची दयनीय अवस्था समोर आणली आहे. या दुरावस्थेबाबत नगरसेवक मंदार ओरसकर व तपस्वी मयेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जानेवारीत नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी मार्केटची पाहणी करून मार्केटची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आठ महिने लोटले तरी मार्केटची दुरावस्था कायम आहे, स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराला नगरपालिका पाठीशी घालत आहे, असे आरोप करत सत्ताधारी व प्रशासनाने मच्छी मार्केटच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा नगरपालिकेवर मोर्चा नेऊ, असा इशारा ओरसकर व मयेकर यांनी दिला.

मालवणच्या मच्छी मार्केटची दुरावस्था झाली असून याबाबत शनिवारी ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार ओरसकर व तपस्वी मयेकर यांनी मच्छी मार्केटची पाहणी केली. या पाहणीत मार्केट मधील महिला व पुरुष स्वच्छता गृह व शौचालयाची अत्यंत वाईट स्थिती असून सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचे, शौचालयाची भांडी फुटल्याचे, शौचालयाच्या टाक्यांमधील सांडपाणी उघड्यावर वाहत असल्याचे, लाईट व्यवस्था नादुरुस्त झाल्याचे, मार्केटच्या मागील बाजूचे दरवाजा शटर तुटल्याचे तसेच मार्केट मध्ये सर्वत्र कुत्र्यांचा वावर असल्याचे व इतर गैरसोयी निदर्शनास आल्याचे नगरसेवक ओरसकर व मयेकर यांनी सांगितले.

मंदार ओरसकर म्हणाले, मच्छी मार्केटची अवस्था दयनीय असताना सत्ताधारी कोणती विकास कामे करत आहेत, मालवणचा विकास करत असल्याचा आव सत्ताधारी का आणत आहेत? असे सवाल ओरसकर यांनी केले. आरोग्य व स्वच्छतेसाठी जो कोणी ठेकेदार नेमला आहे, त्याची मच्छी मार्केटच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे. असे असताना येथे किती अस्वच्छता आहे हे दिसून येते. याबाबत आम्ही वारंवार आवाज उठवल्यावर आम्ही विकासकामात अडथळे आणत आहोत असा आमच्यावर आरोप केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news