सिंधुदुर्ग : मालवण शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत होणार

आ. नीलेश राणे यांच्या हस्ते आज भूमिपूजन शुभारंभ
Water supply scheme
Nilesh RaneFile Photo
Published on
Updated on

मालवण ः महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर अभियानातून मालवण शहराची जलवाहिनी अर्थात मालवण शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत होणार आहे. सुमारे 43 कोटी प्रशासकीय मान्यता रक्कमेतून नळपाणी योजनेचे विस्तारीकरण व नूतनीकरण होणार आहे. आ. नीलेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने महायुती शासनाच्या माध्यमातून ही योजना मंजूर झाली आहे, अशी माहिती माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दिली.

पाणीपुरवठा योजना कामाचा भूमिपूजन शुभारंभ खा. नारायण राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सोमवार, 6 जानेवारी रोजी मालवण येथे होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणून उपस्थित राहणार आहेत. पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन जल शुद्धीकरण केंद्र कुंभारमाठ येथे होणार आहे. तर भरड-मालवण येथील नगरपरिषद वाहनतळ येथे भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे.

सोहळ्याचे निमंत्रक मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे हे आहेत. मालवण शहराला पाणीपुरवठा करणारी योजना माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी 1999 साली साली विशेष बाब म्हणून मंजूर करून आणली. धामापूर तलावातून पाणी उपसा करून मालवण शहरापर्यंत आणली गेलेली ही पाणीपुरवठा योजना अतिशय महत्वपूर्ण ठरली. शहरातील अनेक भागात उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई, किनारपट्टी भागात असलेली क्षारयुक्त पाण्याची समस्या यावर पाणीपुरवठा योजना वरदान ठरली आहे, अशी माहिती दीपक पाटकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news